शनिवारी झालेल्या मनसेच्या बैठकीत अमित ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेवरुन अनेक प्रश्न उपस्थित होतायत. विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवासाठी ईव्हीएम यंत्रणेला दोष देण्याचे पक्षाचे धोरण असले, तरी पराभवासाठी आपणच जबाबदार आहोत असे माझे स्पष्ट मत अमित ठाकरेंनी व्यक्त केल्याची माहिती मिळतेय. पराभवाला ईव्हीएम यंत्रणा जबाबदार असेल असे पक्षातीलच पदाधिकाऱ्यांचे मत असेल तर ते सिद्ध करून दाखवा, असे आवा्हनही अमित ठाकरेंनी केल्याचे समजते. त्यामुळे अमित ठाकरे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेलाच छेद दिल्याचे बोलले जात आहे.