शक्तिपीठ महामार्ग विरोधात शेतकरी एल्गार पुकारण्याच्या भूमिकेत आहेत. कोल्हापुरात बारा जिल्ह्यातील शक्तिपीठ बाधित शेतकऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत बारा मार्च ला विधान भवनावरती भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. जमिनी जर शक्तिपीठ महामार्गात गेल्या तर पुढच्या पिढीला शेती राहणार नाही. बागायती जमिनी नष्ट होण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनू शकेल अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या आहेत.