सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतमोजणी होणार आहे..सांगली जिल्हा परिषदेच्या 61 जागा आणि 122 पंचायत समितीच्या 340 गणांसाठी मतमोजणी होणार आहे... सांगलीत जवळपास 70 टक्के इतके मतदानाची नोंद झाली... आज मतमोजणी पार पडणार आहे... ,10 तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.. या निवडणुकीच्या निमित्ताने आजी-माजी आमदार, खासदारांसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा आपणाला लागलेली आहे सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला प्रत्यक्षात सुरुवात होणार असून 192 टेबल आणि 122 फेऱ्यांमधून मतमोजणी होणार आहे,प्रशासनाकडून मतमोजणीची जयत तयारी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी करण्यात आलेली आहे.