सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात शेतजमिनीच्या वादातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.आटपाडीच्या मुख्य चौकात शेतजमिनीच्या वादातून अतुल हाके यांच्यावर प्राणघातक हल्ल्या करण्यात आलाय,या प्रकरणी तक्रार देऊनही आरोपी मोकाट असल्याचा आरोप करण्यात येतोय.जमिनीतील 15 गुंठे हिस्सा नावावर करून देण्याचा तगादा अतुल हाके यांच्या मागे लावला होता.पीडिताने आता आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई आणि कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणी केली आहे.6 जून रोजी ही घटना घडली असून आता याचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलंय.