ऑपरेशन टायगर'च्या वाढत्या चर्चांदरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. उबाठा शिवसेनेचे परभणीचे ज्येष्ठ खासदार संजय (बंडू) जाधव यांनी बंडखोरी करून महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास, त्यांना थेट केंद्रीय मंत्रिमंडळात मोठी संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.