पुण्यातील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर (Lohagad Fort) फिरायला गेलेल्या केतन अग्रवाल (Ketan Agarwal) या २६ वर्षीय तरुणाचा दरीत कोसळून मृत्यू झाल्याची घटना सुरुवातीला अपघात वाटली होती. मात्र, पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपास आणि माहितीच्या आधारे या प्रकरणाची धक्कादायक 'Inside Story' समोर आली आहे. केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिनेच तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्या मदतीने केतनची लोहगडावरून ढकलून निर्घृण हत्या केल्याचे उघड झाले आहे.