बीड प्रकरणी आज पुण्यामध्ये जनाक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ हा मोर्चा असेल तर देशमुख कुटुंबीय तसेच सर्व पक्षीय नेते देखील यावेळेस उपस्थित असतील. लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या मोर्चाचं आयोजन केलं जाईल.