प्रसिद्ध शनि शिंगणापूर देवस्थान ट्रस्टमध्ये कोट्यवधी रुपयांच्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी सुरू असतानाच, देवस्थानचे माजी विश्वस्त आणि माजी उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (सोमवार) सकाळी समोर आली आहे.