शनिवार-रविवार आणि प्रजासत्ताकदिनाच्या सलग सुट्यांमध्ये साईबाबांची शिर्डी भाविकांनी दुमदुमून गेलीये.. शनिवारी रात्री पासूनच शिर्डीत भावीकांचा प्रचंड ओघ वाढला आणि शिर्डी हाऊसफुल झाली.. वाहनतळ, रस्ते, दर्शनबारी सर्वत्र भावीकांची प्रचंड गर्दी असून शिर्डीला धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने पाहील जात असल्याचं दिसून येतय.. दोन दिवसांची सुटी आणि देवदर्शन असा अनोखा मेळ घालत भाविक शिर्डीत दाखल झालेय.. साईमंदिराच्या दर्शन रागंतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनिल दवंगे यांनी