भाजपच्या Kaustubh Gawade यांना शिवसेनेचं आव्हान, पुणे शिक्षकमध्ये कोण मारणार बाजी? | NDTV Marathi
Shiv Sena challenges BJP’s Kaustubh Gawade; who will emerge victorious in the Pune Teachers' constituency election?
पुणे विभागात शिक्षक मतदारसंघासाठी एकूण 310 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. 62 हजार मतदार त्यांच्या मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीत महायुतीत मोठी बंडखोरी झाली असून महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार जयंत तासगावकर, महायुतीचे अधिकृत उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या विरोधात शिवसेनेच्या पाठिंब्यावर सचिन सानप, माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होत आहे. अपक्ष उमेदवारांची संख्या मोठी असल्याने या निवडणुकीत मत विभाजन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे होणारे मत विभाजन महाविकास आघाडी किंवा महायुतीच्या पथ्यावर पडते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.