डोंबिवलीत गणेशोत्सवापूर्वीच 'आनंदी कलाकेंद्र'चा मूर्तिकार गायब झाला.प्रफुल्ल तांबडे असं बेपत्ता झालेल्या मूर्तीकाराचं नाव आहे. डोंबिवली पश्चिम येथील महात्मा फुले रोडवर असलेले आनंदी कलाकेंद्र नावाच्या कारखान्यातील घटना आहे.शेकडो डोंबिवलीकरांनी दोन-तीन महिन्यांपूर्वी मूर्ती बुक केल्या होत्या.मूर्तिकाराचा फोन बंद, कारखानाही नसल्याने, मूर्ती घेण्यासाठी आलेल्या भक्तांची निराशा झाली.गणपती बाप्पाला घरी आणायचे कसे, या चिंतेत शेकडो भाविक आहेत. दोन-तीन महिन्यांपासून केलेल्या बुकिंगचे पैसे गेले वाया, मूर्तीही नाही...गणेश भक्तांनी डोंबिवलीत संताप व्यक्त केलाय