आज भारतासाठी अभिमानाचा दिवस आहे. आजचा दिवस हा प्रत्येक भारतीयासाठी महत्त्वाचा आहे. याचं कारण पुढच्या तासाभरात भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन आणि भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला इतिहास रचणार आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर भारताच्या शुभांशू शुक्लासह चार अंतराळवीरांना घेऊन जाणारी 'अॅक्झिओम-४' मोहीम पुढच्या तासाभरात अंतराळात झेपावणार आहे. मोहिमेचे नेतृत्व कमांडर पेंगी व्हिटसन करीत असून, अंतराळवीर शुक्ला 'पायलट असतील. या मोहिमेचे पहिले प्रक्षेपण २९ मे रोजी होणार होते. परंतु, 'स्पेसएक्सच्या फाल्कन रॉकेटच्या बूस्टरमध्ये द्रव ऑक्सिजन गळतीमुळे प्रक्षेपण लांबले. त्यानंतर विविध कारणांमुळे हे प्रक्षेपण लांबत होते. फ्लोरिडातील'नासा'च्या कॅनडी अंतराळ केंद्रावरून हे यान प्रक्षेपित केले जाईल. या मोहिमेसाठी भारताने ५५० कोटी खर्च केले आहेत.