आजकाल स्मार्टफोन चा वापर सर्वांकडून केला जातोय. लहान मुलांना देखील स्मार्टफोन सहजपणे उपलब्ध होतो. सध्या ज्येष्ठ नागरिक तरुण सुद्धा सोशल मीडिया वरती सक्रिय असतात. सोशल मीडिया चे जसे काही फायदे आहेत तसेच काही तोटे सुद्धा असतात. आता अठरा वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती, खातं उघडण्यासाठी आईवडिलांची परवानगी घ्यावी लागेल इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून वैयक्तिक डिजिटल दाता संरक्षण अधिनियमांचा नियमांचा मसुदा तयार करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात अठरा फेब्रुवारी पर्यंत सूचना किंवा आक्षेप नोंदवावे लागणार आहेत.