उत्तम जानकर ईव्हीएम विरोधात दिल्लीतल्या जंतरमंतरवर आंदोलन करणार आहेत.येत्या 25 तारखेपासून जानकर ईव्हीएमविरोधात आंदोलन सुरु करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर उत्तम जानकरांनी आज संजय राऊतांची भेट घेतली. दिल्लीतल्या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन जानकरांनी राऊतांना केलंय..