पेपरफुटी प्रकरणात सरकारकडून कठोर कारवाईचा बडगा, CM Devendra Fadnavis काय म्हणाले ?

पेपरफुटी प्रकरणात यापुढे मोठी कारवाई केली जाणार आहे...पेपरफुटी करणाऱ्यांना आता १० कोटींचा दंड 10 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा सुनावली जाईल. भरती आणि स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीने दुसरा अहवाल सादर केला.. अहवालामध्ये पेपरफुटी आणि संघटित गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कायद्याची शिफारस करण्यात आली आहे...संघटित गुन्हेगारीत सहभागी व्यक्ती आणि संस्थांना ७ ते १० वर्षांच्या कारावासाची शिफारस करण्यात आली आहे. यामध्ये किमान १० कोटी रुपयांचा दंड आणि मालमत्ता जप्त करण्याची तरतूद सुचवली आहे.

संबंधित व्हिडीओ