मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अटकेतील आरोपींचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी असलेल्या संबंधांवरुन भाजप आमदार सुरेश धस यांनी आरोपांची राळ उठवली असताना...आता याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी धस यांना गृहखात्यावर विश्वास नाही का, आरोपी स्वतःहून आत्मसमर्पण होत असेल...तर गृहखातं झोप काढत होतं का असं म्हटलं आहे.