ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून उद्या मतदान आहे.अशातच मतदानाच्या पूर्वसंध्येला विरारमध्ये भाजप कार्यालयात मतदारांना पैशांची पाकिटे वाटली जात असल्याचा गंभीर आरोप बहुजन विकास आघाडीने केलाय.बहुजन विकास आघाडीचे उपसभापती निषाद चोरगे आणि माजी सभापती प्रशांत राऊत यांनी कार्यकर्त्यांसह विरार येथील भाजप कार्यालयात अचानक धाव घेतली.कार्यालयात पैशांची पाकिटे आणि मतदारांच्या याद्यांचे वाटप सुरू असल्याचा आरोप करत, बविआ पदाधिकाऱ्यांनी ते साहित्य स्वतःच्या ताब्यात घेतलंय