कितीही मोठ्या बापाचा पोरगा - पोरगी असेल तरी हयगय करू नका,सगळ्यांना कायदा नियम सारखाच अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस खात्याला दिल्यात.तर कुणीही गंमत म्हणून पोलिसांना फोन करू नका, जर कळालं की गंमत म्हणून फोन केलाय तर मी त्याची अशी गंमत करीन की त्याच्या दहा पिढ्या आठवणीत राहतील असा अजितदादांनी पदाधिकाऱ्यांना दम भरलाय.