नाशिकच्या राजकारणात आजच्या दिवसात अनेक ट्विस्ट आलेत. मामा राजवाडे, सुनील बागुल यांचे आजचे प्रवेश भाजपकडून थांबवण्यात आलेयत. गणेश गीतेंना अंतर्गत विरोध होता तर दुसरीकडे मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांच्यावर गुन्हे दाखल होते. त्या पार्श्वभूमीवर दोघांच्याही पक्ष प्रवेशांना ब्रेक लावण्यात आलाय. तर दुसरीकडे मामा राजावाडे आणि सुनील बागुल यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आलीय. तर प्रथमेश गीतेंना नाशिक महानगर प्रमुख नियुक्त करण्यात आलंय.