गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातलंय. त्याचा सगळ्यात जास्त फटका भाजीपाला पिकांना बसला आहे. मनमाड जवळच्या दिलीप सांगळे या शेतकऱ्याने एका एकरात लावलेल्या कोथिंबीर पिकाचं त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सततच्या पावसाने ही कोथिंबीर पिवळी पडून सडू लागली. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे बळीराजा हतबल झालेला आहे.