Nandurbar| भर उन्हाळ्यात अवकाळी पावसामुळे नदीला पूर,अक्कलकुवा तालुक्यातील मोरबा नदीला पूर | NDTV

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे.सातपुड्याच्या डोंगराळ मुसळधार अवकाळी पाऊस झालाय. त्यामुळे अक्कलकुवा तालुक्यातील मोरबा नदीला मे महिन्यात पूर आलाय.उन्हाळ्यात नदीला आलेला पूर पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.नंदुरबार जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक भागात मोठ्या प्रमाणात घरांचे आणि शेतीचे नुकसान झालंय.जिल्ह्यात अजून दोन दिवस हवामान खात्याने येलो अलर्ट दिला असून हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

संबंधित व्हिडीओ