#VinodPatil #ChhatrapatiSambhajinagar #Encroachment छत्रपती संभाजीनगर शहरातील अतिक्रमण हटाव कारवाईविरोधात विनोद पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अतिक्रमणग्रस्तांना मोबदला देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश असूनही महापालिका आयुक्त त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भात जाब विचारण्यासाठी ते आज मनपा आयुक्तांच्या निवासस्थानी जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्तांच्या निवासस्थानाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.