MMRDA ला जाग; वडाळा-कासारवडवली संपूर्ण Metro मार्गाची 3 दिवस चौकशी होणार, विशेष पथकाची नियुक्ती

मुलुंड येथील एलबीएस मार्गावर मेट्रो ४ च्या कामादरम्यानची दुर्घटना मिलन रोड बिल्डटेक या उपकंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे एमएमआरडीएनं केलेल्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास एमएमआरडीएने पोलिसांना सांगितले आहे. त्याचबरोबर या घटनेनंतर जागे झालेल्या एमएमआरडीएने मेट्रो ४ मार्गिकेची संपूर्ण तपासणी करण्यासाठी विशेष सखोल सुरक्षा तपासणी पथक नियुक्त केले असून, या पथकाकडून तीन दिवस तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली. मेट्रो ४ मार्गिकेवरील अपघात घडलेल्या भागाचा कंत्राटदार रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्टर-अस्टाल्डी जेव्ही आहे. त्यांनी हे काम उपकंत्राटदार मिलन रोड बिल्डटेक या कंपनीला दिले आहे. त्यांच्याकडून कामादरम्यान गंभीर हलगर्जीपणा बाळगल्याने ही दुर्दैवी घटना घडली. आता या घटनेनंतर मार्गिकेची संपूर्ण तपासणी करण्यासाठी पावले उचलली आहेत. याद्वारे मार्गिका अधिक सुरक्षित करण्यात येणार आहे.

संबंधित व्हिडीओ