वाशिम जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा सलग सहाव्या दिवशीही कायम आहे.. अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध नसल्याने वाहनधारकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ज्या पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध आहे त्या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. खरीप हंगामाच्या मशागतीची कामे सुरू असतानाच डिझेल टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.