Washim| पैसे मागितल्याने पान टपरी चालकाला मारहाण, गुन्हा दाखल; आरोपी फरार | NDTV मराठी

वाशिम शहरातील लाखाळा परिसरात पान शॉपवर घेतलेल्या साहित्याचे पैसे मागितल्याच्या कारणावरून दुकानदाराला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मारहाणीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शेतकरी पान शॉपवर पान आणि इतर साहित्य घेतल्यानंतर पैसे मागितल्याच्या कारणावरून ज्ञानेश्वर सरनाईक यांना आरबाज खान युसूफ खान आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे, तर त्यानंतर एसएमसी शाळेजवळही गोंधळ घातल्याची माहिती समोर आली आहे.

संबंधित व्हिडीओ