अहिल्यानगर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे उत्तर नगर येथील जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी पदाचा त्वरित राजीनामा घ्यावा.पक्षातून हकालपट्टी करण्याची तृप्ती देसाईंनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलीय. नितीन दिनकर हे पदाचे आमिष देऊन महिलांना धाब्यावर बोलवणे ,बियर बार मध्ये बोलवणे, स्वतः दारू पिऊन महिलांना डान्स करायला लावणे अशाप्रकारे पदाचा गैरवापर करून महिलांना त्रास देत आहेत.अशा पद्धतीची लेखी तक्रार भूमाता ब्रिगेडच्या कार्यालयात दिनकर यांच्या विरोधात काही महिलांनी दिली आहे.नितीन दिनकर हे राधाकृष्ण विखे पाटील यांचे जवळचे व्यक्ती असल्याने त्याच्याविरोधात जाहीरपणे कुणी बोलत नाही, असाही आरोप तृप्ती देसाईंनी केलाय.दरम्यान भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काय प्रतिक्रिया दिलीए पाहुयात