ठाकरे बंधू एकत्र आलेले असताना एकनाथ शिंदेंनी आता नवी खेळी केलीय.महापालिका निवडणुकीआधी रिपब्लिकन सेना आणि शिवसेनेची युती झालीय.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेसोबत शिंदेंची युती झालीय, पालिकेसाठी शिंदेंकडून दलित मतांची जुळवाजुळव सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय मुंबईतील अनेक भागात याचा फायदा होऊ शकतो अशी चर्चा आहे, दुपारी 1 वाजता शिंदे आणि आंबेडकरांची पत्रकार परिषद होणारेय.