भाजप नेते सुधीर मुनगंटीवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या भेटीला गेल्याची माहिती समोर आली आहे. तासाभरापासून त्यांची बैठक सुरू असून मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं ते नाराज असल्याची चर्चा आता जोर धरू लागलेली आहे.