जाहिरात

240 Crore Lottery News: तरुणासाठी आईच्या जन्मतारखेचे लॉटरी तिकीट ठरलं लकी, 240 कोटी रुपयांचा लागला जॅकपॉट

240 Crore Lottery News: 29 वर्षीय तरुण रातोरात अब्जाधीश झाला आहे. 240 कोटी रुपयांची लॉटरी लागल्यानं एका क्षणात त्याचं आयुष्य बदलून गेलंय.

240 Crore Lottery News: तरुणासाठी आईच्या जन्मतारखेचे लॉटरी तिकीट ठरलं लकी, 240 कोटी रुपयांचा लागला जॅकपॉट
  • अबूधाबी में रहने वाले 29 वर्षीय अनिल कुमार ने यूएई लॉटरी में 240 करोड़ रुपये से अधिक का जैकपॉट जीता है.
  • अनिल कुमार ने अपने इस बड़े इनाम को सही जगह निवेश करने और सोच-समझकर खर्च करने की इच्छा जताई है.
  • वह अपनी पहली खरीद के रूप में सुपरकार लेना चाहते हैं और परिवार के साथ यूएई में समय बिताना चाहते हैं.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

240 Crore Lottery News: देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो, हे वाक्य तुम्ही ऐकलेच असेल. 29 वर्षीय अनिल कुमारसोबतही असेच काहीसे घडलंय. रातोरात या तरुणाचं नाव अब्जाधीशांच्या यादीमध्ये सामील झालंय. अबुधाबी येथे वास्तव्यास असणारा भारतीय नागरिक अनिल कुमारने सांगितलं की त्याला युएई लॉटरीमध्ये DH 100 मिलियन म्हणजे भारतीय चलनानुसार जवळपास 240 कोटी रुपयांचा जॅकपॉट लागलाय. खलीज टाइम्सच्या रिपोर्टनुसार, 18 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या 23व्या लकी डे ड्रॉ#251018 मध्ये त्याने हे बक्षीस जिंकलंय.  इतकी मोठी रक्कम कशी खर्च करणार? असा प्रश्न विचारल्यानंतर त्याने म्हटलं की, "योग्य ठिकाणी गुंतवणूक करेन आणि योग्य पद्धतीने खर्च करण्याचा विचार करतोय. हा जॅकपॉट जिंकल्यानंतर माझ्याकडे पैसा आहे, याची मला जाणीव होतेय. मला काहीतरी मोठे करायचे आहे."

अनिल कुमारला खरेदी करायचीय सुपरकार

अनिल कुमारने पुढे असंही म्हटलं की,"एक सुपरकार खरेदी करायचीय. तसेच या क्षणाचा आनंद एका मोठ्या रिसॉर्ट किंवा 7 स्टार हॉटेलमध्ये साजरा करायचाय. मला माझ्या कुटुंबाला युएईमध्ये घेऊन यायचंय आणि त्यांच्यासोबत आयुष्य जगण्याचा आनंद घ्यायचाय. माझे आईवडील छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये खूश असतात. मला त्यांचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करायचंय".  

240 कोटी रुपयांचा जॅकपॉट जिंकण्याचा कसा होता अनुभव?

अनिल कुमारने जॅकपॉट जिंकल्याच्या क्षणाचा अनुभवही शेअर केला. त्या रात्री इतकी मोठी रक्कम जिंकणारा तो एकमेव भाग्यवान विजेता नव्हता. आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेल्या अन्य 10 स्पर्धकांनी 24 लाख रुपयांचं बक्षीस जिंकल्याचंही त्याने सांगितले. सुरुवातीपासून ते आतापर्यंत या लॉटरीमध्ये जवळपास 200 हून अधिक विजेत्यांनी 24 लाख रुपयांची लॉटरी जिंकलीय तसेच कित्येकांना महागड्या स्वरुपातील बक्षीसांचंही वाटप करण्यात आलंय. युएई लॉटरीचे कमर्शियल गेमिंग डायरेक्टर स्कॉट बर्टन यांनी अनिल कुमारचे अभिनंदन केले. बर्टन यांच्या मते, हे मोठे बक्षीस केवळ त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलणार नाही तर लॉटरी गेममधील ही एक मोठी कामगिरी देखील आहे.

Marriage News: 6 सख्ख्या भावा बहिणींनी आपसात केलं लग्न, त्यामागचं कारण ऐकून पायाखालची वाळू सरकेल

(नक्की वाचा: Marriage News: 6 सख्ख्या भावा बहिणींनी आपसात केलं लग्न, त्यामागचं कारण ऐकून पायाखालची वाळू सरकेल)

किती टॅक्स भरावा लागेल?

युएईमध्ये लॉटरी जिंकल्यानंतर कोणत्याही प्रकारचा टॅक्स लागत नाही, त्यामुळे अनिल कुमार यांनी जिंकलेले बक्षीस पूर्णपणे करमुक्त आहे. पण भारतामध्ये लॉटरी बक्षीसांवर 30 टक्के टॅक्स आकारला जातो. यानंतर 15 टक्के अधिभार (1 कोटी रुपयांहून अधिक जिंकलेल्या रकमेवर) आणि एकूण रकमेवर चार टक्के आरोग्य-शिक्षण उपकर आकारला जातो. म्हणजे भारतामध्ये एखाद्या व्यक्तीने 240 कोटी रुपये जिंकले असते तर त्यांना एकूण 86 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर भरावा लागेल आणि टॅक्स भरल्यानंतर अंदाजे 154 कोटी रुपये हाती येतील. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com