कबुतरांना दाणे टाकल्याने महिलेला 79 हजार रुपयांचा दंड

11 एप्रिल 2023 रोजी शामला यांना संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास कबुतरांना दाणे खायला घालत असताना अधिकाऱ्यांनी पाहिले होते. या अधिकाऱ्यांनी शामला यांना हटकले होते आणि पक्षांना दाणे खायला घालू नका असे बजावले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

भूतदया दाखवण्यासाठी अनेकजण कबुतरांना दाणे खायला घालतात.  सनमुगमनाथन शामला (70) यांना कबुतरांना दाणे खायला घालणं महागात पडलं आहे.  शामला यांना 79 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे. शामला या सिंगापूरच्या रहिवासी असून त्यांनी कबुतरांना दाणे खायला घातल्याचे मान्य केले. ज्यानंतर त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. 

सनमुगमनाथन शामला यांनी आपल्या घराच्या जवळ कबुतरांना दाणे खायला घातले होते. शामला यांचा गुन्हा सिद्ध झाल्याने त्यांना 1200 सिंगापुरी डॉलर्सचा दंड ठोठवण्यात आला.  न्यूज एशिया या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार सिंगापूरमध्ये जंगली पक्षांना खायला घालणे हा गुन्हा आहे. शामला यांनी कायद्याचा भंग करत या कबुतरांना खाण्यासाठी दाणे घातले होते. राष्ट्रीय उद्यानात सुरू असलेल्या कबुतरे पकडण्याच्या मोहिमेमध्ये अडथळा निर्माण केल्याच्या आरोपासह शामला यांच्याविरोधात 11 आरोप करण्यात आले होते. लोरोंग (लेन) 4 तोआ पायोह इथे शामला राहात असून घराच्या जवळच त्यांनी कबुतरांना खायला ङातलं होतं. 

Advertisement

नक्की वाचा : 65 वर्षांच्या प्रेयसीच्या घरी पोहोचला 45 वर्षाचा प्रियकर, शारीरिक संबंधाला नकार देताच घडलं भयंकर!

11 एप्रिल 2023 रोजी शामला यांना संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास कबुतरांना दाणे खायला घालत असताना अधिकाऱ्यांनी पाहिले होते. या अधिकाऱ्यांनी शामला यांना हटकले होते आणि पक्षांना दाणे खायला घालू नका असे बजावले होते. सिंगापूरच्या वन्यजीव कायद्यामध्ये जंगली जनावरे, पक्षी यांना परवानगीशिवाय खायला घालणे हे बेकायदेशीर मानले जाते. अधिकाऱ्यांनी हटकल्यानंतरही शामला यांनी कबुतरांना दाणे खायला घालणे सुरूच ठेवले होते. नोव्हेंबर 2024 पर्यंत  त्या कबुतरांना दाणे खायला घालत असल्याचे अधिकाऱ्यांना कळाले होते. यामुळे शामला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि खटला दाखल करण्यात आला. न्यायाधीशांनी शामला यांना दंड भरा नाहीतर जेलमध्ये जात असा इशारा दिला होता. यावर शामला यांनी आपल्या प्रकृतीचे कारण पुढे करत जेलमध्ये जाण्यापेक्षा दंड भरणे पसंत केले. बुधवारी शामला यांनी दंडाची रक्कम भरल्याचे सांगण्यात आले आहे. 

Advertisement