Angry Woman Viral Video : महिलांशी हुज्जत घालून त्यांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या लोकांचे अनेक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. भरधाव वेगानं दुचाकी चालवून भर रस्त्यात रोमान्स करणाऱ्या कपल्सचे विचित्र कारनामेही कॅमेरात कैद होतात अन् ते व्हिडीओ तुफान व्हायरल होतात. नुकताच एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामुळे नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. लखनऊच्या पेट्रोल पंपावर एका महिलेनं तुफान राडा केल्याची घटना नुकतीच समोर आलीय. काही चालकांनी पेट्रोल पंपावरील नियमांचं उल्लंघन करून तेथील कर्मचाऱ्यांना धमकावल्याची प्रकरणेही समोर आली आहेत.पण लखनऊच्या पंपावर नेमकं उलट घडलं आहे. पेट्रोल भरण्यासाठी रांगेत असलेल्या महिलेला कर्मचाऱ्यांनी वेळेवर पेट्रोल दिलं नाही. कर्मचाऱ्यांनी नियमांचं पालन न केल्याने महिला प्रचंड संतापली अन् नंतर तिने जे काही केलं, ते पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
नेमकं घडलं तरी काय?
पहिला नंबर असूनही पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दुचाकीत पेट्रोल न भरल्याने,महिलेचा राग अनावर झाला. या महिलेनं पायातील चप्पल काढली अन् पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि दुचाकीस्वाराला शिविगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. महिलेनं त्या व्यक्तीची दुचाकी ढकलली आणि हातातील फोनही खेचला.या घटनेबाबत पोलिसांनाही सांगेन, अशी धमकीही महिलेनं कर्मचाऱ्यांना दिली. लखनऊच्या पेट्रोल पंपावर दुचाकी चालवणाऱ्या महिलेनं मोठा गोंधळ घातला.
व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की,पेट्रोल पंपावर एक महिला तिच्या दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी नियमानुसार रांगेत असते.तिचा नंबर आधी असतानाही पंपावरील कर्मचारी दुसऱ्या व्यक्तीच्या दुचाकीत पेट्रोल टाकतात. हा प्रकार महिलेला सहन न झाल्याने ती रागाच्या भरात पायातील चप्पल काढते आणि त्या व्यक्तीला मारण्याचा प्रयत्न करते. तसच महिला पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि दुचाकीस्वाराला शिविगाळ करत असल्याचंही व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
इथे पाहा व्हायरल व्हिडीओ
महिलेनं पेट्रोल पंपावर धिंगाणा घातल्याचा व्हिडीओ @gharkekalesh या एक्स हँडलवर व्हायरल करण्यात आला आहे. व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षावही केलाय. पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेलेल्या महिलेचा रुद्रावतार पाहून कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. या घटनेबाबत महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली की नाही, याबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती समोर आली नाहीय. दरम्यान, लखनऊच्या या पेट्रोल पंपावर क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या महिलेची इंटरनेटवर चर्चा रंगलीय. पेट्रोल पंपावर दुचाकीच्या नंबरवरून महिला कर्मचाऱ्यांवर एव्हढी का संतापली? असा सवालही नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर उपस्थित केला आहे.