जाहिरात

Menstruation Cyle: मासिक पाळी सुरू झाली की केळीच्या झाडाशी लग्न! देशात 'इथं' आजही पाळली जाते अजब परंपरा

Menstruation Tradition: मासिक पाळीबद्दल आता जागृती होत असली तरी त्याबाबत अनेक अंधश्रद्धा (Myths) आहेत आणि लोक त्यासाठी अनेक आश्चर्यकारक गोष्टी करतात.

Menstruation Cyle: मासिक पाळी सुरू झाली की केळीच्या झाडाशी लग्न! देशात 'इथं' आजही पाळली जाते अजब परंपरा
Menstruation Tradition: मासिक पाळी आल्यावर होणारं हे लग्न मुलीचं पहिलं लग्न मानलं जातं.
मुंबई:

Menstruation Tradition: आपल्या देशात आजही अनेक प्रकारचे रीतिरिवाज आणि परंपराचं पालन होतं. त्या समजल्यावर तुम्हाला अजब वाटू शकतं. पण, तरीही ते श्रद्धेनं पाळण्याची संख्या मोठी आहे. मासिक पाळीबद्दल आता जागृती होत असली तरी त्याबाबत अनेक अंधश्रद्धा (Myths) आहेत आणि लोक त्यासाठी अनेक आश्चर्यकारक गोष्टी करतात. भारतात एक जागा अशी आहे, जिथे मासिक पाळीसंबंधी एक विचित्र परंपरा पाळली जाते. इथे मुलीला पहिल्यांदा पाळी आल्यावर तिचं लग्न एका केळीच्या झाडाशी लावलं जातं. लोक असं का करतात आणि ही परंपरा कशी पाळली जाते, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

कुठं होतं लग्न?

आसामच्या काही भागांमध्ये आजही ही परंपरा पाळली जाते. यामध्ये,  मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी येते, तेव्हा तिला वेगळं ठेवलं जातं. या कालावधीमध्ये मुलगी काही दिवस आपल्या कुटुंबापासून अलिप्त राहते आणि तिच्यावर सूर्यप्रकाश देखील पडू दिला जात नाही. त्यानंतर तिचं लग्न एका केळीच्या झाडाशी लावलं जातं. हे लग्न खूप धूमधडाक्यात होतं. या लग्नाला तोळिनी ब्याह (Toloni Byah) म्हणतात. आसाममधील बोगांइगाव जिल्ह्यातील सोलमारी (Solmari) येथे आजही ही परंपरा सुरू आहे.

( नक्की वाचा : Menstruation Cycle: मासिक पाळीचा 'हा' Viral Video पाहून डोळ्यात येईल पाणी, या कुटुंबानं जिंकली सर्वांची मनं )
 

सामान्य लग्नांप्रमाणेच, झाडाशी होणाऱ्या या लग्नातही लोक जल्लोष करतात आणि खूप गाणं-बजावणं (Music and Celebration) होतं. या आनंदात मुलीचं संपूर्ण कुटुंब सहभागी होतं. असं सांगितलं जातं की, या दरम्यान मुलीला खाण्यासाठी फक्त फळं (Fruits) दिली जातात. लग्नानंतर मुलगी पहिल्यासारखं सामान्य आयुष्य जगू लागते.

खरं लग्न कधी होतं?

मासिक पाळी आल्यावर होणारं हे लग्न मुलीचं पहिलं लग्न मानलं जातं. मात्र, जेव्हा मुलगी मोठी होते आणि विवाहाच्या वयाची (Marriageable age) होते, तेव्हा तिच्यासाठी मुलगा (Groom) शोधला जातो आणि मग तिचं लग्न त्याच्याशी लावलं जातं. म्हणजेच, ही फक्त अनेक वर्षांपासून चालत आलेली एक परंपरा आहे, जी आजही पाळली जाते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com