जाहिरात

Asia Cup Final 2025: आशिया कप स्पर्धेचा इतिहास बदलला! 41 वर्षांनंतर पहिल्यांदाच 'असं' घडणार

क्रिकेट चाहत्यांच्या नजरा रविवारी होणाऱ्या त्या ऐतिहासिक संध्याकाळकडे लागल्या आहेत, जेव्हा हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ पहिल्यांदाच आशिया कपच्या फायनलमध्ये आमनेसामने येतील.

Asia Cup Final 2025: आशिया कप स्पर्धेचा इतिहास बदलला! 41 वर्षांनंतर पहिल्यांदाच 'असं' घडणार

 Asia Cup Final 2025 India Vs Pakistan: आशिया कप २०२५ चा अंतिम सामना इतिहास रचणार आहे. स्पर्धेच्या ४१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ विजेतेपदासाठी आमनेसामने येणार आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणाऱ्या या महामुकाबल्यासाठी सोशल मीडियावर प्रचंड उत्साह दिसून येत आहे आणि सामन्याच्या ७२ तास आधीच हा ट्रेंड सुरू झाला आहे. बांगलादेशला हरवून पाकिस्तानने अंतिम फेरीत स्थान मिळवले, तर भारत आधीच पात्र ठरला होता. आता क्रिकेट चाहत्यांच्या नजरा रविवारी होणाऱ्या त्या ऐतिहासिक संध्याकाळकडे लागल्या आहेत, जेव्हा हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ पहिल्यांदाच आशिया कपच्या फायनलमध्ये आमनेसामने येतील.

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर गुरुवारी बांगलादेश आणि पाकिस्तान (Bangladesh Vs Pakistan) यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानविरुद्ध दमदार सुरुवात केली होती, परंतु अखेरीस त्यांचे फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले आणि पाकिस्तानने बांगलादेशला ११ धावांनी हरवून अंतिम फेरीत स्थान मिळवले. आता पाकिस्तानला रविवारी भारताशी दोन हात करायचे आहेत. विशेष म्हणजे, आशिया कपच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तानचे संघ अंतिम सामन्यात कधीही आमनेसामने आलेले नाहीत.

Jasprit Bumrah: 'Inaccurate again'! जसप्रीत बुमराहचा बड्या खेळाडूला 'तगडा' रिप्लाय, वाचा काय आहे वाद?

आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचा रेकॉर्ड| India Vs Pakistan Record In Asia Cup 

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत १८ सामने झाले आहेत, ज्यापैकी भारताने १० आणि पाकिस्तानने ६ सामने जिंकले आहेत, तर २ सामने अनिर्णित राहिले आहेत.

एकूण सामने: १८

भारताचा विजय: १०

पाकिस्तानचा विजय: ६

अनिर्णित सामने: २

आशिया कप स्पर्धेत भारताची कामगिरी सरस

आकडेवारी भारताच्या बाजूने असली तरी, आशिया कप २०२५ मध्ये भारताने पाकिस्तानला दोनदा हरवले आहे. मैदानाच्या बाहेरही या सामन्याची चर्चा इतकी गरम झाली आहे की, अंतिम सामन्याचा तणाव आतापासूनच वाढू लागला आहे. ICC ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून सुपर फोर च्या सामन्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजीचे कौतुक केले आहे.

दरम्यान,  माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाण यांनी X वर एक ट्विट केले आहे. ते म्हणाले, “आशिया कपच्या ४१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना पाहायला मिळणार आहे. भारताने आपले वर्चस्व दाखवून दिले आहे आणि इतर संघांच्या तुलनेत असलेला फरक स्पष्ट केला आहे. पाकिस्तानच्या संघानेही सुधारणा दर्शवली आहे, विशेषतः गोलंदाजीत.”

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com