92 व्या वर्षी डॉक्टर झाले बाबा; 37 वर्षांच्या पत्नीने दिला गोंडस बाळाला जन्म, सर्वात मोठा मुलगा तर...

Interesting Story: डॉ. लेविन एक जनरल प्रॅक्टिशनर आहे आणि वृद्धत्व कमी करणाऱ्या अँटी एजिंग औषधाचे तज्ज्ञ आहेत. काही दिवसांपूर्वी ते बाबा झाले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
Child Birth Story

Father at age of 92 year : ऑस्ट्रेलियात एक असं प्रकरण समोर आलं आहे जिथं 92 वर्षी डॉक्टर बाबा झाले आहेत. त्यांच्या 37 वर्षीय पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. ऑस्ट्रेलियाचे डॉक्टर जॉन लेविन यांची पत्नी जॉ. यानयिंग लू यांनी मुलाचं नाव गॅबी ठेवलं आहे. गॅबीचा जन्म डॉक्टरांच्या 65 वर्षीय मुलाच्या मृत्यूच्या पाच महिन्यांनतर झाला आहे. ग्रेगचा मृत्यू मोटर न्यूरॉन डिसीसमुळे झाला होता. डॉ. लेविन एक जनरल प्रॅक्टिशनर आहे आणि वृद्धत्व कमी करणाऱ्या अँटी एजिंग औषधाचे तज्ज्ञ आहेत. काही दिवसांपूर्वी ते बाबा झाले आहेत. आता त्यांनी याबाबतची माहिती शेअर केली आहे. 

पहिल्या पत्नीचा मृत्यू 57 व्या वर्षी..

ऑस्ट्रेलियन मीडियानुसार, लेविन यांच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू वयाच्या ५७ व्या वर्षी झाला होता. ज्यानंतर ते एकटे पडले होते. यानंतर त्यांनी नवी भाषा मंदारिन शिकण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान ते डॉक्टर यानयिंग लु यांना भेटले. त्या मूळच्या चिनी आहेत. भाषा शिकत असताना दोघे जवळ आहे आणि एकत्रितपणे वेळ घालवू लागले. 2014 मध्ये लास वेगासमध्ये दोघे लग्नबंधनात अडकले. 

नक्की वाचा - VIDEO: रस्त्यात मिळाले निळे अंडे, कपलने घरी आणले, 50 दिवसांनी अंड्यातून जे बाहेर पडले...

कोविड लॉकडाऊनपर्यंत असा विचार केला नव्हता...

या दाम्पत्याने कोविड-19 लॉकडाऊनपर्यंत बाळाचा विचार केला नव्हता. मात्र बऱ्याच सल्ल्यानंतर यानयिंग यांनी बाळाचा विचार केला. पतीच्या मृत्यूनंतर बाळाच्या रुपात त्यांचा अंश आपल्यासोबत असावा या इच्छेने तिने निर्णय पक्का केला. 

Advertisement

डोनर स्पर्ममधून गर्भवती

आईवीएफ डोनर स्पर्मच्या माध्यमातून यानयिंग गर्भवती झाल्या आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांची गर्भधारण यशस्वी झाली. डॉ. लेविन यांचं म्हणणं आहे की, वयाच्या 92 व्या वर्षी जेव्हा त्यांनी मुलाला कुशीत घेतले, तेव्हा त्यांना आनंद गगनात मावत नव्हता.   

यानयिंग यांचं म्हणणं आहे की, त्यांचा मुलामुळे आयुष्यात आनंद आला आहे. अनेक जण डॉ. लेविन यांना त्याचे आजोबा म्हणतात. मात्र खरं सांगितल्यानंतर त्यांना धक्का बसतो. मात्र हा आमचा निर्णय होता आणि आम्ही यामुळे खूप खूश आहोत. लोक काय विचार करतात यावर आमचं नियंत्रण असू शकत नाही. 

Advertisement

Topics mentioned in this article