Mumbai News : मुंबईतील रिक्षाचालकाची कमाई पाहून BTech झालेल्या तरुणाला धक्का; म्हणाला इथंच येऊन...

मुंबईतील रिक्षा चालकांची कमाई पाहिली तर अनेकजण हैराण होतील.

जाहिरात
Read Time: 1 min

Rickshaw Driver Viral Video : दिवसभर रिक्षा चालवणं कठीण काम असतं. रिक्षाचालक किती दमत असतील. मात्र दिवसभरातील कमाई पाहून सर्व थकवा दूर होत असेल हे नक्की. मुंबईतील रिक्षा चालकांची कमाई पाहिली तर अनेकजण हैराण होतील. ते दररोज अंदाजे २५०० रुपये कमवतात.

Uvichar नावाच्या एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये तरुणाने रिक्षा चालकाला विचारलं होतं की, मुंबई शहर किती महाग आहे ना. यावर रिक्षा चालक होत म्हणतात. मात्र एक महत्त्वाची गोष्टही सांगतात. ते पुढे म्हणतात, मी दिवसाला साधारण २५०० रुपये कमावतो. सर्व खर्च काढून २५०० रुपये शिल्लक राहतात. हे ऐकून मागे बसलेला तरुण अवाक् होतो. म्हणजे हा रिक्षाचालक दरमहिन्याला ७५००० रुपये कमावतो. पुढे तरुण तर अनेकांना मुंबईत येऊन रिक्षा चालविण्याचा सल्ला देतो.

Advertisement

या व्हिडिओवर मोठ्या संख्येने कमेंटही येत आहेत. अनेकांनी म्हटलंय आता रिक्षा चालकच व्हावं लागेल.