डोक्यावरील केस अचानक कमी होणे, टक्कल पडणे यामुळे देशभरात लाखो जण त्रस्त आहेत. डोक्यावर पुन्हा केस यावे यासाठी ते वेगवेगळे उपाय करत असतात. डोक्यावर केस येण्यासाठी अचूक औषध असल्याचा दावा करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. फक्त 20 रुपयांमध्ये टक्कल कमी करण्यासाठी हा लग्नाच्या हॉलमध्ये मोठी गर्दी झाली. आयोजकांनाही इतकी गर्दी होईल याचा अंदाज नव्हता. त्यानंतर त्यांना त्यावर नियंत्रण करण्यासाठी चांगलीच धावपळ करावी लागली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय घडला प्रकार?
उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये हा प्रकार घडला. टकलााची समस्या दूर करण्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हायरल व्हिडिओ पाहून रविवारी सकाळी मेरठमधील सांगितलेल्या पत्त्यावर मोठी गर्दी जमा झाली. इथं आलेला प्रत्येक जण डोक्यावरील केस कमी झाल्यानं किंवा टक्कल पडल्यानं त्रस्त होता.
व्हायरल व्हिडिओमध्ये विशेष औषध घेतल्यानं टकलावर केस येतील हा दावा करणारे लोकं मेरठमधील बिजनौरचे राहणारे आहेत. ते दिल्लीमधील मंडौली भागात बऱ्याच दिवसांपासून या पद्धतीचा एक कँप चालवत आहेत.
मेरठमधील दोन दिवसांच्या कँपची व्यवस्था करणाऱ्या आयोजकांनी आपल्या दिल्लीतील सेंटररही मोठी गर्दी असते. त्यामुळे तिथं मेरठच्या लोकांचा नंबर लागत नाही, असा दावा केला. हे औषध देणारे सलमान आणि अनीस मेरठमधील आयोजकांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे त्यांच्या विशेष विनंतीनंतर त्यांनी मेरठमध्ये दोन दिवस (रविवार आणि सोमवार) कँप ठेवला होता.
या स्पेशल कँपच्या आयोजकांनाही इतकी गर्दी होईल हा अंदाज नव्हता. त्यांनी शहरातील शौकत बँकेट हॉलमध्ये या कँपचे आयोजन केले होते. पण, इथं पाहता-पाहता इतकी गर्दी झाली होती की त्यामुळे सर्व व्यवस्था कोलमडली.
त्यानंतर आयोजकांना औषधं देण्याची व्यवस्था हॉलच्या जागी मोकळ्या मैदानात करावी लागली. त्याचबरोबर टोकन सिस्टम सुरु करुन गर्दी नियंत्रित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण, त्यानंतरही गर्दी नियंत्रित करणे अवघड जात होते.
काही महिन्यांमध्ये केस येण्याचा दावा
हे औषध देणारे अनिस यांनी सांगितले की ते या उपचारासाठी फक्त 20 रुपये चार्ज करतात. तेलाची बाटली घेण्यासाठी 300 रुपये द्यावे लागतात. अनिस यांनी सांगितलं की, हे उपचार घेणाऱ्यांना पहिल्यांदा वस्तऱ्यानं डोक्याचं मुंडण करावं लागतं. त्यानंतर ते औषध लावतात. हे औषध लावल्यानंतर घरी गेल्यानंतर सांगितलेल्या पद्धतीनं खोबऱ्याचं तेल लावावं लागतं.
एका आठवड्यात डोक्यावर थोडे-थोडे केस उगवतात. काही महिन्यांमध्ये पूर्ण केस येतात.
( नक्की वाचा : 100 वर्षांचा नवरा, 102 वर्षांची नवरी, 9 वर्षांची लव्हस्टोरी! जगावेगळ्या लग्नाचा वर्ल्ड रेकॉर्ड )
जगभरातून ग्राहक
अनीस यांच्या दाव्यानुसार त्यांच्याकडं उपचारासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून ग्राहक येतात. इतकंच नाही तर विदेशी ग्राहकांची कॅम्पमध्ये उपस्थिती असते. परमेश्वराच्या कृपेनं जवळपास सर्वांनाच याचा चांगला फायदा होतो.
या कँपमुळे जवळपासच्या सलूनची चांगलीच चांदी झाली. केसाचं मुंडण करण्यासाठी लोकांनी सलूनच्या बाहेर रांग लावली होती. या गर्दीमुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. एक रुग्णवाहिका देखील या कोंडीमध्ये अडकली होती.