Bengaluru Cab Scam: शहरामध्ये प्रवास करताना आपण अनेकदा ओला, रॅपिडो कॅब सेवेचा वापर करतो. जलद आणि स्वस्तात सेवा मिळत असल्याने अनेकजण ओला, उबेर सारख्या टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांना प्राधान्य देतात. मात्र अनेकदा प्रवाशांना या कंपन्यांच्या मनमानी कारभाराला सामोरे जावे लागते, असाच धक्कादायक प्रकार बंगळुरुमध्ये समोर आला आहे. एका कॅब ड्रायव्हरने फक्त 285 रुपयांमध्ये कॅब बुक केली होती, मात्र प्रवास संपताच त्याला 6000 बिल दाखवण्यात आले. नेमकं काय आहे हे प्रकरण? वाचा...
बेंगळुरुमध्ये मोठा स्कॅम..
बंगळूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कॅब चालकाने प्रवाशाकडून ठरलेल्या भाड्यापेक्षा कित्येक पटीने जास्त भाड्याची मागणी केली. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली, ज्यानंतर कॅबस्कॅम वरुन नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. प्रवासाआधी ठरलेले भाडे नंतर अचानक वाढल्याने कॅब वापरणाऱ्यांना अलर्ट राहण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने ओला ॲप वापरून मॅजेस्टिक ते जळहल्लीसाठी कॅब बुक केली होती. भाडे फक्त २८५ रुपये होते. मात्र, प्रवासानंतर चालकाने त्याच्या फोनवर ५,९५० रुपयांचे बिल दाखवले आणि प्रवाशाला सांगितले की ही रक्कम भरावी लागेल. चालकाने दावा केला की प्रवाशाने यापूर्वी काही राईड्स रद्द केल्या होत्या, त्यामुळेच त्याच्याकडून पैसे आकारले जात होते.
जेव्हा प्रवाशाने ॲपवर दाखवलेल्या भाड्याबद्दल त्याला जाब विचारला, तेव्हा चालक आक्रमक झाला आणि पैसे देण्यासाठी दबाव टाकत राहिला. जेव्हा चालकाने कन्नड भाषेत बोलू लागला तेव्हा मात्र प्रवाशाची मोठी अडचण झाली, कारण त्याला ही भाषा समजत नव्हती. त्यानंतर प्रवाशाने तात्काळ कंपनीच्या आपत्कालीन कार्यालयाशी संपर्क केला, परंतु तिथेही त्याला कोणतीही मदत दिली नाही. तेथील कर्मचाऱ्यांचीही भाषा उद्धट होती, त्यांनी या समस्येकडे गांभीर्याने पाहिले नाही, असं या प्रवाशाने म्हटलं आहे.
नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
दरम्यान, शेवटी प्रवाशाचा घरमालक घटनास्थळी पोहोचल्यावर परिस्थिती निवळली. त्याने ड्रायव्हरला पोलीस स्टेशनला जाण्याचा सल्ला दिला. ते पोलीस स्टेशनच्या जवळ पोहोचत असताना, ड्रायव्हरने गाड मध्येच वळवली आणि तो पळून गेला. ही घटना उघडकीस आल्यानंतर, सोशल मीडियावर लोकांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काहींच्या मते, अशा परिस्थितीत तात्काळ ११२ वर फोन करायला हवा. त्याच वेळी, अनेक वापरकर्त्यांनी कॅब कंपन्यांच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अनेकांचे मत आहे की केवळ पैसे परत करणे हा समस्येवर उपाय नाही, तर अशा ड्रायव्हर्सवर कठोर कारवाई केली पाहिजे.
Rupali Chakankar: "अहंकार धुळीस मिळेल, Wait and Watch..." रुपाली चाकणकरांना कुणी दिला इशारा?