शरद सातपुते, सांगली:
Sangli Politics: सांगली जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीने सत्ता आणल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजप नेते संजयकाका पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. संजयकाका पाटील यांना आम्हीच तिकडची माहिती काढण्यासाठी पाठवले, असा गौप्यस्फोट त्यांनी केला होता. यावरुनच आता संजयकाका पाटील यांनीही जोरदार पलटवार केला आहे. जयंत पाटलांनी भाजप प्रवेशासाठी उंबरे झिजवले, असा दावा त्यांनी केला आहे.
संजयकाका पाटलांचा जयंत पाटलांना इशारा
"भाजपात जाण्यासाठी जयंत पाटलांनी किती वेळा उंबरे झिजवले याचा साक्षीदार संजयकाका पाटील आहे असे म्हणत जयंत पाटील भाजपात जाण्यासाठी आग्रही होते," असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी केला आहे. जयंत पाटील यांचे राजकारण अडचणीत आणणारे असून जयंत पाटलांनी आगीशी खेळू नये, असा इशाराही यावेळी संजयकाका पाटील यांनी दिला आहे.
Rupali Chakankar: "अहंकार धुळीस मिळेल, Wait and Watch..." रुपाली चाकणकरांना कुणी दिला इशारा?
तसेच तुमचा काळा इतिहासा काढायला भाग पडू नये,असा इशारा देत आपल्याला त्यांनी भाजपासोबत पाठवलं हे जयंत पाटलांनी त्यांच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगावे,असे आव्हान देखील संजयकाका पाटील यांनी जयंत पाटलांना दिले आहे. सांगली जिल्हा परिषद निवडणुकीवरून जयंत पाटलांनी संजयकाका पाटलांच्यावर टीका केल्यानंतर दोन्ही नेत्यांवर चांगलीच जुंपल्याचे दिसत आहे.
चंद्रकांत पाटलांकडून दुजोरा
दरम्यान, जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाचे संजयकाका पाटील साक्षीदार आहेत,पण मी त्या प्रक्रियेतील पार्ट टाईम पार्सल आहे, म्हणजे सर्व प्रक्रियेचा भाग त्यामुळे मला जास्त काही बोलायला लावू नका असं विधान भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. संजयकाका पाटील यांच्या वक्तव्याला मंत्री चंद्रकांत पाटलांनी दुजोरा देत आपण त्या प्रक्रियेचा भाग आहे असं विधान केले आहे, यामुळे जयंत पाटील व भाजपा प्रवेशावर आता पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
Pune News: पुण्यात वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये मोठा बदल होणार; RTO ने घेतला महत्वाचा निर्णय
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world