'मी श्रेयस अय्यरला नवरा मानते, त्याच्या दोन मुलांची आई' खळबळजनक दाव्यानंतर Bigg Boss स्पर्धक म्हणते...

Edin Rose on Shreyas Iyer : श्रेयस अय्यर अविवाहित असल्यानं अनेक तरुणींचा क्रश आहे. त्यामध्ये एका नव्या क्रशची भर पडलीय. ही कुणी साधी क्रश नाही. तिची प्रेम व्यक्त करण्याची पद्धतही सामान्य नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins
Edin Rose, Shreyas Iyer : मी श्रेयसला पती मानलंय, दोन मुलांची आई आहे असं एडिननं सांगितलं होतं.
मुंबई:

भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चांगलाच चर्चेत आहे. श्रेयससाठी हे वर्ष जबरदस्त ठरलंय. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्यानं टीम इंडियाकडून सर्वात जास्त रन्स केले. भारताच्या विजेतेपदाच त्याचं मोठं योगदान होतं. श्रेयसच्या कॅप्टनशिपमध्येच पंजाब किंग्जनं (Punjab Kings) आयपीएल 2025 मध्ये फायनलमध्ये प्रवेश केला. तब्बल 11 वर्षांनंतर पंजाबला फायनलपर्यंत नेण्याचं श्रेय त्याच्या कॅप्टनसीला दिलं गेलं. फॉर्मातील श्रेयसचा इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट टीममध्ये का समावेश केला नाही? असा प्रश्न अनेक फॅन्स विचारत आहेत.

श्रेयस अय्यरच्या खेळाचे लाखो फॅन्स आहेत. तो अविवाहित असल्यानं अनेक तरुणींचा क्रश आहे. त्यामध्ये एका नव्या क्रशची भर पडलीय. ही कुणी साधी क्रश नाही. तिची प्रेम व्यक्त करण्याची पद्धतही सामान्य नाही. तिनं श्रेयसला मनातून पती मानलंय. तसंच त्याच्या दोन मुलांची आई असल्याचं जाहीर केलं आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

'मी श्रेयसच्या दोन मुलांची आई'

मी स्वत:ला श्रेयस अय्यरच्या दोन मुलांची आई समजते, असा गौप्यस्फोट एका मुलाखतीमध्ये देऊन खळबळ उडवणऱ्या तरुणीचं नाव आहे एडिन रोज (Edin Rose). एडिन ही दुबईत वाढलेली तरुणी मॉडेल आहे. ती बिग बॉस 18 ची स्पर्धकही होती. 

एडिनने फिल्मीज्ञानशी बोलताना सांगितलं की, 'मला वाटतं की मी त्याच्या (श्रेयस अय्यर) मुलांची आई आहे, माझ्या मते मी आधीच त्याच्याशी लग्न केले आहे.' त्याचबरोबर ती म्हणाल्या की, 'मी या गोष्टीबद्दल सकारात्मक राहीन, कारण जेव्हा तुम्ही इतका विचार करता, तेव्हा तुमचे प्रयत्न कुठेतरी ऐकले जातात.' मला जसा व्यक्ती आवडतो ते सर्व गुण श्रेयसमध्ये आहेत, असं एडिननं सांगितलं. तसंच तिने श्रेयस हा तिच्या वडिलांसारखा आहे,' असंही या मुलाखतीमध्ये सांगितलं. 

Advertisement

गोंधळ होताच म्हणाली...

एडिनचं हे वक्तव्य सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं. ती प्रसिद्धीसाठी हा खटाटोप करत असल्याचा दावा काही जणांनी केला. त्यावर एडिननं अखेर स्पष्टीकरण दिलं आहे. 'माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला' असा दावा तिनं केलाय.

मी नेहमीच उपहासात्मक बोलते. पण मला आता काळजीपूर्वक बोलावं लागेल. कारण लोकांना बोललेलं समजत नाही. मला खोटा देखावा करावा लागेल, तसंच बोलावं लागेल. एका सामान्य तरुणीला कुणी आवडत असेल तर ते ठीक आहे. पण, सेलिब्रेटींना असं करण्याची परवानगी नाही. 

Advertisement

( नक्की वाचा : Shreyas Iyer : 'श्रेयसनं गुन्हेगारी कृत्य केलं, कोणतीही माफी नाही' माजी क्रिकेटपटू संतापले )

लोकांना वाटतंय की हे माझ्या PR टीमचं काम आहे. पण, तसं नाही. ते फक्त माझं काम आणि प्रोजेक्टचं प्रमोशन करतात. मी हे प्रसिद्धीसाठी करतेय असं ज्यांना वाटतं, त्यांना मी कोण आहे हे माहिती आहे का? मी हे असं करु शकत नाही,' असंही एडिननं सांगितलंय.
 

Topics mentioned in this article