Indian Groom And Japani Bride Wedding Card Viral : लग्नाचा हंगाम सुरु झाला की सोशल मीडियावर नवरा-नवरीचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होतात.कुठे त्यांच्या डान्सची चर्चा असते, तर कुठे पाहण्यांच्या लग्नमंडपातील भन्नाट डान्स व्हायरल होतो.पण सध्या एक लग्नपत्रिका व्हायरल झाली आहे, ज्याची इंटरनेटवर जोरदार चर्चा रंगली आहे. @noncontextualmemes नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटर वर पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये एक लग्नपत्रिका दिसते. पण त्या पत्रिकेत नवरीबद्दल असं काही लिहिलेलं असतं, जे वाचून लोकांच्या भुवयाच उंचावतात. ही पत्रिक फार महागडी आहे, असंही वाटत नाही. तसच पुत्रिकेची डिझाईन खूप वेगळी आहे, असंही नाही. तरीही ही पत्रिका तुफान व्हायरल झाली आहे. यामागे नेमकं काय कारण आहे? जाणून घेऊयात.
पत्रिकेतील माहिती वाचून सर्वच झाले थक्क
राहुल कुमार असं नवऱ्याचं नाव आहे. तो बिहारच्या मधेपुरचा रहिवासी आहे आणि सध्या जपानमध्ये मोठ्या कंपनीत काम करतो. मरीन असं नवरीचं नाव आहे, जे पत्रिकेत लिहिलेलं आहे. पण जेव्हा नवरा-नवरीच्या आई वडिलांचं नाव समोर येतात,तेव्हा खरं सरप्राईजच समोर येतं. पत्रिकेतील माहितीनुसार, वधूच्या आईचं नाव आहे अतुशी ओहाशी आणि वडिलांचं नाव कनाको आहे.यावरून स्पष्ट होतं की, वधू जपानी आहे आणि हे एक भारत-जपान ( India-Japan ) आंतरराष्ट्रीय लग्न आहे. वर-वधू दोघांचंही पत्ता जपानचाच दिला आहे.
नक्की वाचा >> Viral Video : नवऱ्याकडे जाण्याआधी नवरी सासऱ्यांच्या मांडीवर का बसते? 'या' ठिकाणी आहे लग्नाची विचित्र प्रथा
लग्नाच्या पत्रिकेचा फोटो व्हायरल होताच यावर कमेंट्सचा पाऊस पडला. काही यूजर्सने लग्नाला 'ग्लोबल' असं म्हटलंय.तर काहींनी ही पत्रिका पाहून मजेशीर प्रतिक्रिया दिल्यात. एका युजरने म्हटलंय, ,"इतकं इंटरनॅशनल लग्न आणि कार्ड इतकं सिंपल?", तर दुसऱ्याने मजेशीर कमेंट करत म्हटलं,"वरात इंट्रा-कॉन्टिनेंटल असेल.", अन्य एका यूजरने म्हटलं,"आता बनेल मटण न्यूडल आणि लिट्टी सुशी." या एका वाक्यात देसी आणि विदेशी संस्कृतीचा मजेशीर संगम दाखवला आहे. या फोटोला आतापर्यंत 4 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. आजच्या युगात जिथे लोक परदेशात काम करत आहेत आणि वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये नाती जोडत आहेत,हे कार्ड बदलत्या भारताचं चित्र दर्शवतो.