Groom And Bride Shocking Video : जगातील वेगवेगळ्या भागांत लग्न हे फक्त दोन व्यक्तींचे नाते नसून ते दोन कुटुंबांचे नाते मानले जाते.आफ्रिकेतील नायजेरियामध्ये राहणाऱ्या एका समुदायात विवाहाशी संबंधीत एक अनोखी प्रथा आहे. अनेकांना ही परंपरा विचित्र वाटू शकते.पण त्यात एक भावनिक संदेश दडलेला आहे, असं तेथील लोकांचं म्हणणं आहे. या रीतिरिवाजाद्वारे नवरीला नव्या कुटुंबात स्वीकारणे,जबाबदाऱ्या सोपवणे आणि नाते अधिक घट्ट करण्यासाठी सांगितलं जातं. लग्नाची ही परंपरा अनोखी असली तरी,त्यामागचा उद्देश आदर,विश्वास आणि कौटुंबिक आपुलकी दाखवणे असा आहे.
लग्नाची अशा प्रथेसंबंधीत एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत पाहू शकता की,लग्नाच्या विधीमध्ये नवरी सर्वात आधी सासऱ्यांच्या मांडीवर आणि नंतर नवऱ्याच्या मांडीवर बसते. नवरी असं एकूण सातवेळा करते. या प्रथेबाबत नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या प्रथेला अश्लील आणि विचित्र म्हटलं आहे. पण ही प्रथा पूर्णपणे सांस्कृतिक आणि कौटुंबिक जबाबदारीशी संबंधीत असल्याचं त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे.
नक्की वाचा >> Video: पतीने स्कूटरमध्ये लावलेल्या GPS ट्रॅकरमुळे पत्नीचं कांड आलं समोर! एका क्षणात 15 वर्षांचा संसार मोडला
सहा वेळा नवऱ्याचे नाव घेतात आणि..
Edo परंपरेनुसार,लग्नाच्या वेळी नवरीच्या कुटुंबातील एक सदस्य सहा वेळा नवऱ्याचे नाव घेतो.सातव्या वेळी नवऱ्याचे नाव नवरीच्या वडिलांकडून घेतले जाते आणि तेव्हाच नवरा त्यावर उत्तर देतो.याचा अर्थ असा की आता तो पूर्ण जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार आहे. त्यानंतर नवरीचे वडील नवऱ्याला समजावतात की,त्याने त्यांच्या मुलीची पूर्ण जबाबदारी घ्यावी. मग ते मुलीला शेवटचा प्रश्न विचारतात की, तिला या व्यक्तीशीच लग्न करायचे आहे का? नवरीन ‘हो'म्हटल्यावर वडील भावनिक शब्दांत सांगतात की आता मुलीचे घर हे माहेरचे राहिले नाही.
नक्की वाचा >> Akola News : शिक्षक बनला बडा एजंट..आंतरजातीय विवाह अनुदानासाठी मागितली लाच , 'असा' अडकला ACB च्या जाळ्यात!
इथे पाहा लग्नाच्या भन्नाट प्रथेचा व्हायरल व्हिडीओ
EDO culture. Can any Edo person tell us the reason behind this tradition? pic.twitter.com/LLzWEG8RXI
— Sabi Radio (@sabiradioonline) October 6, 2023
त्यानंतर नवरीचे वडील तिला नवऱ्याच्या वडिलांकडे नेतात आणि सातवेळा मांडीवर बसवतात.याचा अर्थ असा की आता नवऱ्याचे वडीलही नवरीला त्यांच्या मुलीसारखे स्वीकारतील. नंतर नवऱ्याचे वडील उभे राहून नवरीला त्यांच्या मुलाच्या म्हणजे नवऱ्याच्या मांडीवर बसवतात, ज्यामुळे विवाह पूर्ण मानला जातो.यानंतर वर-वधू एकमेकांना प्रथम साखर आणि मध खाऊ घालतात, मग कडवट कोला नट (bitter kola) चा स्वाद घेतात. याचा अर्थ असा की वैवाहिक जीवनात गोडवा असेल आणि कडवटपणाही असेल आणि दोघांनी ते एकत्र स्वीकारले पाहिजे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world