भाजपा नगरसेवकाची महिलांनी केली धुलाई, भर बाजारात चोपले ! पाहा Video

BJP councillor beaten : भाजपा नगरसेवक अरविंद शर्मा यांची महिलांनी धुलाई केली. शर्मा आणि त्यांच्या समर्थकांवर महिलांशी गैरवर्तन केल्याचा तसंच त्यांना अपशब्द वापरल्याचा आरोप आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील भाजपा नगरसेवक अरविंद शर्मा यांची महिलांनी धुलाई केली. शर्मा आणि त्यांच्या समर्थकांवर महिलांशी गैरवर्तन केल्याचा तसंच त्यांना अपशब्द वापरल्याचा आरोप आहे. महिलांनी भर रस्त्यात नगरसेवकांना मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

काय आहे प्रकरण?

भोपाळमधील शाहपुरा भागातील हॉकर्स स्ट्रीटवरील हा प्रकार आहे. व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये महिला नगरसेवक अरविंद शर्मा यांना थप्पड लगावत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये नगरसेवक आणि समर्थकांवर महिलांनी गैरवर्तन केल्याचा तसंच अपशब्द वापरल्याचा आरोप करत आहेत. या घटमेनंतर दोन्ही पक्षांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. त्यावेळी पोलीस स्टेशनमध्येही मोठा गदारोळ झाला. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

भाजपानं बजावली नोटीस

अरविंद शर्मा यांच्या मारहणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. जिल्हा अध्यक्ष सुमीत पचौरी यांनी या प्रकरणात नाराजी व्यक्त केली असून त्यांनी तीन दिवसांमध्ये बाजू मांडण्याचे निर्देश शर्मा यांना दिले आहेत. 

काँग्रेसची टीका

भाजपा नगरसेवकाच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसनं त्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही. मध्य प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेते उमंग सिंघार यांनी X वर व्हिडिओ शेअर करत भाजपावर टीका केली. 'हा खरा भाजपा आहे. त्यापासून लोकं इतके त्रस्त आहेत', असा टोला सिंघार यांनी लगावला. 

Advertisement

तक्रार दाखल

या प्रकरणात भाजपा नगरसेवक शर्मा यांनी महिलांवर मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे आणि शिवीगाळ करणे हे आरोप करत FIR दाखल केली आहे. तर महिलांकडून फक्त अर्ज घेण्यात आला आहे. त्यावर महिलांनी नाराजी व्यक्त केलीय. नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या महिलांवर यापूर्वी देखील हे आरोप करण्यात आले आहेत. 

( नक्की वाचा : पत्रकार Live मुलाखत घेत होते, तितक्यात इस्रायलचं क्षेपणास्त्र धडकलं, पुढं काय झालं... पाहा Video )
 

कारण उघड

अरविंद शर्मा यांना महिलांकडून झालेल्या मारहणीचं मुख्य कारण वसूली आणि अतिक्रमण असल्याचं सांगितलं जात आहे. भोपाळमधील शाहपूरा स्ट्रीटवर हा प्रकार घडला. त्यामध्ये दुकांनाच्या भाड्याची वसूली, आणि अतिक्रमणाबाबत बातम्या येत असतात. काही दिवसांपूर्वी या भागातील अतिक्रमण हटवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. पण, अनेक दुकानं अद्यापही सुरु आहेत. 
 

Advertisement