जाहिरात
This Article is From Sep 25, 2024

पत्रकार Live मुलाखत घेत होते, तितक्यात इस्रायलचं क्षेपणास्त्र धडकलं, पुढं काय झालं... पाहा Video

पत्रकार Live मुलाखत घेत होते, तितक्यात इस्रायलचं क्षेपणास्त्र धडकलं, पुढं काय झालं... पाहा Video
मुंबई:

पश्चिम आशियातील लेबनॉनच्या विरोधातील युद्ध इस्रायलनं तीव्र केलं आहे. इस्रायलनं गेल्या पाच दिवसात लेबनानची राजधाना बैरुत तसंच उत्तर आणि दक्षिण भागातील हिजबुल्लाहच्या ठिकाणांना लक्ष्य केलं आहे. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात आत्तापर्यंत 600 जणांचा मृत्यू झालाय. लेबनानमधील भीषण परिस्थिती दाखवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लेबनानमधील पत्रकार फादी बुदाया  (Fadi Boudaya) हे लाईव्ह मुलाखत घेत असताना अचानक धडकलेल्या इस्रायलच्या क्षेपणास्त्रानं त्यांना टार्गेट केलं.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत लेबनानचे पत्रकार आणि मिराया इंटरनॅशनल नेटवर्कचे मुख्य संपादक फादी बुदाया टीव्हीवर लाईव्ह मुलाखत घेत होते. त्यावेळी अचानक स्फोट होतो आणि बुदाया त्यांचं संतुलन गमावतात. या व्हिडिओमध्ये ते कॅमेऱ्याच्या समोर पडत असल्याचंही दिसत आहे. 

हिजबुल्लाह समर्थक

याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार बुदाया हिजबुल्लाहचे समर्थक मानले जातात. हा हल्ला इस्रायल आणि लेबनॉनमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या संघर्षात करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये इस्रायलनं लेबनानमध्ये अनेक हल्ले केले आहेत. पहिल्या दिवशी पेजर ब्लास्ट झाले. दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी वॉकी-टॉकीचे स्फोट झाले. या हल्ल्यांना इस्रायलनं लेबनानला जबाबदार धरलं आहे. तर, इस्रायलनं पेजर आणि वॉकी टॉकी स्फोटाची जबाबदारी घेतलेली नाही, अथवा त्याचा इन्कारही केलेला नाही. 

लेबनानमधील पेजर स्फोटाचं केरळ कनेक्शन ? वायनाडमधील तरुणाचा शोध सुरु

( नक्की वाचा :  लेबनानमधील पेजर स्फोटाचं केरळ कनेक्शन ? वायनाडमधील तरुणाचा शोध सुरु )

बुदाया यांनी सोशल मीडियावर त्यांच्या घरावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याची माहिती दिली आहे. 'तुम्ही कॉल आणि मेसेज करुन माझ्याबद्दल काळजी व्यक्त केली. त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. अल्लाहच्या दयेनं मी ठीक आहे. आम्ही आमच्या मीडिया ड्युटीवर परत येत आहोत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: