Groom And Bride Viral Video : लग्नसोहळ्यात एक छोटीशी चूकही खूप महागात पडू शकते. लग्नात एखादी महत्त्वाची गोष्ट वेळेवर न झाल्यास लग्नाचे फेरेही थांबू शकतात. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका लग्नाच्या व्हायरल व्हिडिओने सर्वच लोकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. कारण लग्नाची सर्व तयारी झाली असताना नवरा मात्र अत्यंत महत्त्वाची गोष्ट विसरतो. त्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसतो. त्यानंतर नवरा स्वत: कॅमेऱ्यासमोर सांगतो की, फेऱ्यांपूर्वीच त्या आठवतं की,सिंदूर घरातच राहिलेलं असतं. लग्नाच्या विधी सुरु होणार होत्या आणि संपूर्ण कुटुंबात थोडी भीती पसरलेली असते. घरची मंडळी चिंताग्रस्त झाल्याचंही या व्हिडीओत पाहायला मिळतं. कारण सिंदूरशिवाय लग्नाचा विधी अपूर्ण मानला जातो. अशा परिस्थितीत नवऱ्याने जे केलं ते पाहून सर्वच थक्क झाले.
ब्लिंकिट डिलिव्हरी ऑर्डरमध्ये नेमकं काय होतं?
या परिस्थितीवर नवरा एक अनोखा उपाय शोधतो.तो सर्वांना सांगतो की त्यांने Blinkit सिंदूर डिलिव्हरीद्वारे लगेच ऑर्डर दिली आहे.हे ऐकताच लोक आश्चर्यचकित होतात की खरंच सिंदूर इतक्या लवकर येऊ शकतो का? यावर नवरा म्हणतो,फक्त 16 मिनिटांत..काही मिनिटांतच ब्लिंकिटची डिलिव्हरी पोहोचते.सिंदूर येताच घरात टाळ्यांचा गडगडाट होतो आणि लग्नाच्या मांडवात आनंदाचं वातावरण निर्माण होतं.वर-वधू सुटकेचा निश्वास सोडतात आणि लग्नाचे विधी कोणत्याही अडथळ्याशिवाय पुढे सुरू होतात.
नक्की वाचा >> Raigad News: "मंगेश काळोखेवर 13 वार करणारा आरोपी वाल्मिक कराडचा साथीदार..", खोपोली हत्याकांडाचं बीड कनेक्शन?
व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया
या Blinkit वेडिंग व्हायरल व्हिडिओला लोकांनी खूप मजेशी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक यूजर्सने म्हटलं आहे की,हा व्हिडिओ आजच्या काळातील तंत्रज्ञान आणि क्विक डिलिव्हरीचं जबरदस्त उदाहरण दर्शवतो.काहींनी याला स्मार्ट इंडियाचे उदाहरणही म्हटलं आहे. तर काहींनी मजेदार प्रमोशनल आयडिया असे संबोधले आहे.हा व्हायरल व्हिडिओ दर्शवतो की, आजच्या काळात क्विक डिलिव्हरी अॅप्स फक्त सुविधा नाहीत,तर कठीण प्रसंगी खरे मदतनीस बनले आहेत. लग्नासारख्या आठवणीत राहणाऱ्या क्षणी ब्लिंकिटच्या 16 मिनिटांच्या डिलिव्हरीने सिद्ध केले की,आता घाबरण्याची गरज नाही.