31st December Latest News : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकांनी जय्यत तयारीही केली असेल. पण 31 डिसेंबर 2025 च्या आधी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं काम करावं लागणार आहे. जर तुम्ही अजूनही तुमचा PAN कार्ड आधारशी लिंक केलेला नसेल,तर नववर्षात तुम्हाला मोठा धक्का बसू शकतो. पॅन कार्ड रद्द होऊ शकतं. ज्यामुळे टॅक्स रिफंड थांबतील आणि बँकेतून पैसे काढणेही कठीण होईल. लाखो लोकांनी ती चूक केल्याने त्यांचं मोठं नुकसान झालंय. पण चूक सुधारण्याची संधी अजूनही आहे.
ते काम इतकं महत्त्वाचं का आहे?
सरकारने PAN आणि आधार जोडणे अनिवार्य केले आहे.जेणेकरून टॅक्स सिस्टम पारदर्शक राहील. लिंकिंगशिवाय पॅन अॅक्टिव्ह राहत नाही. त्यामुळे नवीन ITR फाइल करता येणार नाही.जुने रिफंडही अडकतील.याशिवाय TDS आणि TCS चे दर दुप्पट होतील,ज्यामुळे तुमच्या खिशावर मोठा भार पडेल. व्यवसाय किंवा गुंतवणूक करणाऱ्यांसाठी तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे.
PAN बंद झाल्यावर काय अडचणी येतील?
सर्वात मोठा परिणाम बँकिंगवर होईल.मोठी रक्कम काढताना जास्त कपात होईल. ITR न भरणाऱ्यांसाठी फक्त 20 लाखांपेक्षा जास्त कॅशवरच कर कपात होईल.नवीन बँक खाते उघडणे,कर्जासाठी अर्ज करणे किंवा शेअर बाजारात गुंतवणूक करणे अशक्य होईल. म्युच्युअल फंड किंवा विमा पॉलिसीही ब्लॉक होतील.छोटे-मोठे व्यवहार चालतील,पण मोठी कामे ठप्प होतील.
नक्की वाचा >> Raigad News: "मंगेश काळोखेवर 13 वार करणारा आरोपी वाल्मिक कराडचा साथीदार..", खोपोली हत्याकांडाचं बीड कनेक्शन?
जर PAN रद्द झालं तर 1 कोटींपेक्षा जास्त कॅशवर 2 टक्के TDS कपात होईल. ITR न भरणाऱ्यांची मर्यादा कमी होऊन 20 लाखांपर्यंत राहील.कपात झालेली रक्कम परत मिळवण्यासाठी रिफंड क्लेम करणेही गुंतागुंतीचे होईल.वर्षाच्या शेवटी पैसे काढण्याचा प्लॅन असेल तर लवकर लिंक करा. बँकांकडून याबाबत सूचनाही देण्यात आल्या आहेत. 1 ऑक्टोबर 2024 पूर्वी आधारसोबत PAN घेतलेल्या लोकांसाठी ही शेवटची संधी आहे. ज्येष्ठ नागरिक किंवा काही विशिष्ट श्रेणीतील लोकांना सूट मिळू शकते. पण बहुतेकांना हे करावेच लागेल. NRI किंवा ईशान्य राज्यांतील रहिवाशांना थोडी सवलत मिळू शकते.
सोप्या स्टेप्सने लिंक कसे करावे?
इनकम टॅक्सच्या वेबसाइटवर लॉगिन करा आणि ‘लिंक आधार' हा पर्याय निवडा. PAN नंबर, आधार टाका आणि मोबाईलवर आलेल्या OTP ने व्हेरिफाय करा. काही मिनिटांत काम पूर्ण होईल. जर PAN नंबर विसरलात, तर आधार वापरून रिकव्हर करा. स्टेटस तपासण्यासाठी डॅशबोर्ड पहा. SMS सेवा देखील उपलब्ध आहे.
नक्की वाचा >> चीनी फोनचा खेळ खल्लास! 'हा' स्मार्टफोन मार्केट करणार जाम, 10000mAh बॅटरी, 12 GB रॅम अन् बरंच काही..
उशीर करू नका, आत्ताच सुरू करा!
31 डिसेंबरनंतर PAN पुन्हा सक्रिय करण्यासाठी आठवडे लागतील आणि तोपर्यंत नुकसान सहन करावे लागेल. नवीन वर्ष तणावमुक्त ठेवण्यासाठी आजच कृती करा. कोट्यवधी PAN धारक या डेडलाइनची वाट पाहत आहेत, गर्दी टाळा. लिंकिंग मोफत आहे, फक्त थोडा वेळ द्या. सुरक्षित राहा, टॅक्समध्ये कोणतीही अडचण येऊ देऊ नका.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world