Blue Egg Viral Video: तुम्ही कधी विचार केला आहे का की, तुम्हाला झुडपात एखादे चमकदार निळ्या रंगाचे अंडे (Blue Egg) सापडले तर तुम्ही काय कराल? ऑस्ट्रेलियातील (Australia) सिडनी (Sydney) येथे एका तरुण जोडप्याने असेच काहीसे केले. त्यांना झुडपात पडलेले एक रहस्यमयी निळे अंडे सापडले आणि ते त्यांनी घरी आणले. पण, त्यांना काय माहीत की, या अंड्यातून एक विशाल पक्षी (Blue Egg Couple Australia) बाहेर येणार आहे, जो त्यांचे आयुष्यच बदलून टाकेल.
50 दिवसांनी अंडे फुटले अन्...
हे अंडे सामान्य कोंबडीच्या अंड्यापेक्षा तब्बल १० पट मोठे होते. त्याचा निळा रंग आणि मोठा आकार पाहून जोडपे थक्क झाले. त्यांनी या अंड्याची काळजी घेण्याचे ठरवले. त्यांनी एका इनक्यूबेटरमध्ये ३७°C तापमान आणि ५०% आर्द्रता ठेवून ते अंडे ठेवले. दररोज ते त्याला उलटून ठेवत आणि त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवत असत. जवळपास ५० दिवसांच्या काळजीनंतर जेव्हा अंडे फुटले, तेव्हा त्यातून बाहेर आलेल्या जीवाला पाहून दोघांचेही डोळे विस्फारले. तो होता एक एमू (Emu), ऑस्ट्रेलियातील एक महाकाय पक्षी (Emu Viral Story), जो दिसायला शहामृगासारखा असतो आणि त्याची उंची सुमारे ६ फूट आणि वजन ५० किलोपर्यंत असू शकते.
एक अनोळखी पक्षी बनला कुटुंबाचा सदस्य...
जसजसा एमू मोठा झाला, तसतसा तो त्या जोडप्याच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग बनला. तो कुटुंबातील सदस्यांसोबत खेळू लागला, त्यांच्यासोबत फिरू लागला आणि घरामध्ये नेहमीच आनंदाचे वातावरण निर्माण करू लागला. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये (Viral Video) त्याला पाळीव प्राण्याप्रमाणे जोडप्यासोबत खेळताना आणि आनंद घेताना पाहिले जाऊ शकते. या अनोख्या प्रवासाची (Amazing Animal Story) कहाणी जोडप्याने सोशल मीडियावर शेअर केली आणि पाहता पाहता हा व्हिडीओ जगभरात व्हायरल झाला.
सोशल मीडियावर प्रेमाचा वर्षाव
@019_editss नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर (Instagram) शेअर केलेल्या या व्हिडीओला कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत. निळ्या अंड्याची आणि एमूची ही कहाणी पाहून लोक खूप भावूक झाले आहेत. अनेक युजर्सनी, ‘इतका सुंदर व्हिडीओ आजपर्यंत पाहिला नाही,' असे लिहिले आहे. तर काहींनी ‘ही कथा माणुसकी आणि दयेचे उत्तम उदाहरण आहे,' असे म्हटले आहे.