Shocking Video : सोशल मीडियावर एक संतापजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मुलगा काकडी विकताना दिसत आहे. हा समुद्रकिनाऱ्यावरील आहे. आजूबाजूला लोक समुद्रकिनाऱ्यावर फिरताना दिसत आहे. तर तिथंच काही अंतरावर तो टोपलीतून काकडी विकताना दिसत आहे. काकडी ताजी दिसावी आणि चमकावी यासाठी तो काकडी तोंडात घालून थुंकी लावून साफ करीत आहे. हे दृश्य केवळ हैराण करणारं नाही तर घृणास्पदही आहे. (seller spat on the cucumber)
काकडीला थुंकी लावली...
मुलाचं हे कृत्य आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. जेव्हा लोक बाजारातून फळं किंवा भाज्या विकत घेतात, ती स्वच्छ असावीत अशी त्यांची अपेक्षा असते. मात्र जर अशा प्रकारे थुंकी लावून विकली जात असेल तर यामुळे केवळ ग्राहकांच्या भावनांशी आणि आरोग्याशी खेळ केला जात आहे. उन्हाळ्याच्या दिवसात अशा प्रकारचं कृत्य संक्रमण आणि पोटासंबंधित आजार पसरवण्यासाठी जबाबदार ठरते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी सोशल मीडियावर रोष व्यक्त केला.
नेटकऱ्यांकडून संताप
व्हिडिओ व्हायरल होताच इंटरनेटवर वाद सुरू झाला आहे. काहींनी म्हटलं की आता काकडी खरेदी करून खाणं भयंकर झालं आहे. तर काहींनी मजेतही प्रतिक्रिया दिली आहे. एकाने म्हटलं की, समोरच समुद्र आहे. तिथ जाऊन धुवायचं होतं. मात्र अधिकांश लोकांनी मुलाच्या कृत्यावर संताप व्यक्त केला आहे. अशा कृत्यांसाठी दंड आकारायला हवं आणि खुलेपणाने विकल्या जाणाऱ्या पदार्थांकडे अधिक लक्ष द्यायला हवं असंही म्हटलं जात आहे.