Girlfriend in suitcase : एखादा व्यक्ती प्रेमात पडला की तो त्यासाठी कोणत्याही पातळीवर जाण्यासाठी तयार असतो. कुणी चंद्र सूर्य तोडण्याची भाषा करतो तर कुणी जीव देण्याचं वचन देतो. या साहेबांनी त्याच्या गर्ल फ्रेंडला सुटकेसमध्ये लपवले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हरियणामधील सोनीपतमधील हा प्रकार आहे. सोनीपतच्या ओपी जिंदाल विद्यापीठाच्या कॉलेज हॉस्टेलमध्ये हा प्रकार घडला. मुलांच्या हॉस्टेलमध्ये मुलींना येण्यास मनाई असते, ही गोष्ट सर्वांना माहिती आहे. पण, इथं राहणाऱ्या मुलाच्या डोक्यावर प्रेमाचं भूत इतकं चढलं होतं की त्यानं त्याच्या गर्लफ्रेंडला सुटकेसमध्ये लपवून हॉस्टेलमध्ये आणलं. पण, तो पकडला गेला.
भांडं कसं फुटलं?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हा मुलगा त्याच्या गर्लफ्रेंडला सुटकेसमध्ये लपवून नेत होता. त्याचवेळी आतमधील मुलगी ओरडली. तो ओरडण्याचा आवाज ऐकून सुरक्षा रक्षकाला संशय आला. त्यानं तातडीनं सुटकेस चेक केली आणि मुलाचं भांड फुटलं. त्या सुटकेसमध्ये सामान नाही तर मुलगी होती. ते पाहून तिथं उपस्थित असणाऱ्या सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी त्या मुलीला तातडीनं सुटकेसच्या बाहेर काढलं.
( नक्की वाचा : अहमदाबादमध्ये अपार्टमेंटला भीषण आग, लोकांनी बाल्कनीला लटकून वाचवला जीव! Video पाहून उडेल थरकाप )
व्हायरल व्हिडिओमध्ये महिला सुरक्षा रक्षकांना या बॅगचा संशय येतो. त्यानंतर त्या बॅगेची तपासणी करतात. सुटकेसमध्ये मुलगी दिसताच सर्वजण आश्चर्यचकीत होतात. त्यानंतर त्या मुलीला बाहेर काढले जाते. ही मुलगी त्या कॉलेजची विद्यार्थीनी आहे की बाहेरची हे अद्याप समजू शकलेलं नाही.