Brazil bungee jump Death Viral Video: साहसी खेळांच्या अतिउत्साहात आणि सोशल मीडियावरील 'व्हायरल' होण्याच्या नादात तरुण पिढी किती मोठी जोखीम पत्करते, याचे भीषण उदाहरण ब्राझीलमधून समोर आले आहे. साओ पाउलो राज्यातील 'पोंटे डो एस्केलेटो' पुलावरून बंजी जंपिंग करताना २४ वर्षीय मारिया एडुआर्डा रोड्रिग्स डी फ्रीटास या तरुणीचा मृत्यू झाला. उडी मारण्यापूर्वी कोणतीही दोरी बांधली नसल्याने ही भयंकर घटना घडली. सुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आणि 'एंट्रे कोर्डास' या खाजगी कंपनीचा निष्काळजीपणा या अपघाताला कारणीभूत ठरला आहे.
दोरी न लावताच घेतली उडी, तरुणीचा मृत्यू
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, मृत मारिया एडुआर्डा रॉड्रिग्स डी फ्रेटास हिने या धोकादायक बंजी जंप आणि व्हिडिओची व्यवस्था करण्यासाठी 'एंत्रे कॉर्डास' नावाच्या एका खाजगी कंपनीला अंदाजे २९० डॉलर्स (सुमारे २४,५०० रुपये) दिले होते. तिला कल्पनाही नव्हती की, सुंदर आठवण म्हणून काढत असलेला हा व्हिडिओ तिच्या आयुष्यातील शेवटचा व्हिडिओ ठरेल.
प्रत्यक्षदर्शींच्या मते, तिच्या आधी त्याच जागेवरून इतर तीन जणांनी उडी मारली होती आणि ते सर्व सुरक्षित राहिले होते. पण जेव्हा या मुलीची पाळी आली, तेव्हा क्रू सदस्यांनी सुरक्षेच्या नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. हा भयंकर निष्काळजीपणा होता. क्रू सदस्यांनी मुलीला उडी मारण्यासाठी ढकलण्यापूर्वी किंवा इशारा देण्यापूर्वी साधी सुरक्षा तपासणीसुद्धा केली नाही आणि तिचा सुरक्षा दोर व्यवस्थित बांधलेला आहे की नाही हे तपासायलाही ते विसरले.
HORRIFIC FOOTAGE: A 21-year-old woman was pushed off a 40-meter bridge in Limeira, Brazil by bungee jump workers who failed to attach her safety rope. She died from the fall. pic.twitter.com/KdZ51iZ2ab
— Open Source Intel (@Osint613) June 13, 2026
जेव्हा पुलावरील इतर पर्यटकांनी ही संपूर्ण घटना त्यांच्या कॅमेऱ्यात चित्रित केली, तेव्हा ते दृश्य भयानक होते. मुलीने पुलावरून उडी मारताच, तिच्या पायांना किंवा शरीराला दोरी बांधलेली नाही हे उपस्थितांच्या लगेच लक्षात आले. संपूर्ण परिसरात किंकाळ्यांचा कल्लोळ उसळला. ती मुलगी ३५ मीटर (सुमारे ११५ फूट) सरळ खाली कोसळली.
धक्कादायक बाब म्हणजे, मुलगी खाली पडल्यानंतरच कंपनीच्या प्रशिक्षकांना आपली भयंकर चूक लक्षात आली. अपघातानंतर लगेचच, तिथे उपस्थित असलेले कर्मचारी घाबरले होते. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, आपली चूक लक्षात येताच आरोपी प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. स्थानिक पोलिसांनी त्यांना घेरून थांबवले. काही माध्यमांच्या वृत्तानुसार, आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world