Video : 2,222 मीटर उंचीवरच्या बर्फाच्छादित डोंगरावर लग्न, परीकथेसारखी झाली नवरीची एन्ट्री

स्वत:चं लग्न हे वेगळं आणि हटके व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

स्वत:चं लग्न हे वेगळं आणि हटके व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. आयुष्यातील महत्त्वाचा दिवस आपल्यासोबतच सर्व जगाला लक्षात राहावा हा देखील काहींचा उद्देश असतो. याच क्रेझमधून एका जोडप्यानं बर्फाच्छादित डोंगरावर लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. समुद्रतळापासून तब्बल 2,222 मीटर उंचावर स्वित्झर्लंडच्या (Switzerland) जर्मेटमध्ये बर्फाच्छादित डोंगरावर त्यांनी लग्न केलं. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामध्ये नवरी मुलगी बर्फातून बाहेर येत असल्याचं दिसत आहे. 

( नक्की वाचा :  स्वर्गवासी मुलीसाठी सुरुय नवऱ्याचा शोध, आई-वडिलांनी दिली पेपरमध्ये जाहिरात )

चोहूबाजूनं सुंदर बर्फ, व्हायोलिनचं संगीत आणि जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये या दोघांचं लग्न झालं. या जोडप्यानं यावेळी आईस क्युबमध्ये एक सुंदर पोज दिली. यावेळी नवरी मुलीची एन्ट्री देखील एखाद्या परिकथेसारखी झाली. कारण ती बर्फाच्या तुकड्यामधून बाहेर आली. लग्नाच्या व्यवस्थेतील स्टाफनंही आईस-क्यूब हेडगियर, आईस-थीमचा ड्रेस घातला होता. त्याचबरोबर जमा झालेल्या आईस-क्यूब ट्रेमधून सर्वांना ड्रिंक देण्यात आलं. 

या जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'हे खरोखरच अत्यंत वेगळं लग्न आहे,' अशी प्रतिक्रिया एका युझरनं दिली. तर, 'अरे देवा हे किती सुंदर लग्न आहे. खूप सुंदर आणि हटके स्टाईल,' अशी प्रतिक्रिया अन्य एका युझरनं दिलीय. 'मी भविष्यात याच पद्धतीनं लग्न करेल,' असं एकानं जाहीर केलंय. तर पहिल्यांदाच इतकं अद्भूत लग्न पाहात असल्याची प्रतिक्रिया अन्य एका युझरनं दिली आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article